शिक्षिकेची ५ वर्षाच्या चिमुरडीला अमानुष मारहाण, school teacher beaten girl student in mumbai

शिक्षिकेची ५ वर्षाच्या चिमुरडीला अमानुष मारहाण

शिक्षिकेची ५ वर्षाच्या चिमुरडीला अमानुष मारहाण

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईत सिनीअर केजीमध्ये शिकणा-या एका पाच वर्षाच्या मुलीला शिक्षिकेनं क्षुल्लक चुकीसाठी अमानुष मारहाण केल्याची घटना उघडकीस आलीय.

गावदेवी पोलिसांनी याप्रकऱणी शिक्षिकेविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केलाय. गावदेवीच्या सेंट कोलंबा हायस्कूलमध्ये सीनिअर केजीमध्ये शिकणा-या एका पाच वर्षांच्या मुलीला मिशेल नावाच्या वर्गशिक्षिकेनं 31 आकडा लिहायला सांगितलं होतं. मात्र त्या मुलीनं 31 ऐवजी 13 आकडा लिहिला. मात्र या चुकीसाठी मिशेलनं त्या मुलीला दोन्ही पायाला लाकडी पट्टीनं बेदम मारहाण केली.

या प्रकारानंतर ती मुलही भेदरलीय. रडतच ती घरी गेली. पालकांनी तिला काय झालं हे विचारण्याचा प्रयत्न केला मात्र ती काहीही बोलण्यास तयार नव्हती. मात्र पालकांनी तिच्या पायावरच्या जखमा पाहिल्या आणि त्यानंतर त्या मुलीनं घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीचे पालक तिला मुख्याध्यापकांकडे घेऊन गेले. मात्र त्यावेळी ती खाली पडल्याचा कांगावा मिशेलनं केला. त्यानंतर या मुलीची जे.जे.हॉस्पिटलमध्ये तपासणी केली असता त्यात ते व्रण मारहाणीचे असल्याचं स्पष्ट झालंय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, January 10, 2014, 16:05


comments powered by Disqus