Last Updated: Wednesday, June 11, 2014, 18:14
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईशरद पवारांची तुलना दहशतवादी हाफिज सईदशी केल्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सामनावर घोषणाबाजी केली. यावेळी सामना वृत्तपत्र कार्यालयाच्या खाली असलेल्या शिवसैनिक आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाजी झाली.
सध्या या ठिकाणी पोलिस आणि रॅपीड अँक्शन फोर्सचे जवान तैनात केले असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
`सामना`मधून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेने राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील प्रभादेवी इथे असलेल्या `सामना` कार्यालयावर मोर्चा काढला आहे.
पुण्यातील फेसबुकप्रकरणानंतर शरद पवारांनी मोदी सरकारवर तोफ डागली होती. शरद पवार हे पाकिस्तानी अतिरेकी हाफिज सईदसारखी गरळ ओकत असल्याची विखारी टीका ‘सामना’तील अग्रलेखातून करण्यात आली आहे. राज्यातील हत्येशी मोदींचा काय संबंध असा सवालही ‘सामना’मध्ये विचारण्यात आला आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, June 11, 2014, 18:12