विधानभवनात बाळासाहेबांचा पुतळा उभारा!, SENA WANTS BALASAHEB STATUE IN MAHARASHTRA VIDHIMADAL

विधानभवनात बाळासाहेबांचा पुतळा उभारा!

विधानभवनात बाळासाहेबांचा पुतळा उभारा!

www.24taas.com, झी मीडिया, सातारा
विधानभवनाच्या आवारात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारावा अशी मागणी शिवसेना आमदार दिवाकर रावते यांनी केलीये.

रावते यांच्या या मागणीला भाजप आणि मनसेनंही पाठिंबा दिलाय. विधानभवन आवारातल्या राष्ट्रपुरूषांच्या पुतळ्यांबाबत एक महत्त्वाची बैठक उद्या होणार आहे. सध्या शिवाजी महाराजांचा पुतळा वगळता ज्योतिबा फुले, यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यांची विधानभवनाकडे पाठ आहे.

या पुतळ्यांची दिशा बदलण्याबाबत या बैठकीत निर्णय होईल. तसंच मारोतराव कन्नमवार, शंकरराव चव्हाण, सुधाकरराव नाईक आणि विलासराव देशमुख यांचे पुतळे नव्यानं उभारण्याबाबतही यात चर्चा होणार आहे. या अनुषंगानं बाळासाहेबांचा पुताळाही विधानभवन आवारात उभारावा, अशी मागणी रावते यांनी केलीये.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, July 17, 2013, 19:38


comments powered by Disqus