दोन वर्षात पहिल्यांदाच – सेन्सेक्स `२०००च्या वर` बंद, Sensex closes above 20,000-mark after two years

दोन वर्षात पहिल्यांदाच – सेन्सेक्स २०,००० पेक्षा जास्त अंकांवर बंद

दोन वर्षात पहिल्यांदाच – सेन्सेक्स २०,००० पेक्षा जास्त अंकांवर बंद
www.24taas.com, मुंबई

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स शुक्रवारी दोन वर्षानंतर पहिल्यांदाच २०,००० अंकांपेक्षा जास्त स्तरावर बंद झाला. डीझेल किंमतींना नियंत्रणमुक्त केल्यामुळे रिफाइनरी कंपन्यांच्या शेअर्सची आज बाजारात चलती राहिली. याशिवाय कंपन्यांच्या अंकांमध्येही सुधारणा जाणवली.

तीस शेअर्सचा सेन्सेक्स ७५.०१ अंकांची उसळी घेऊन (०.३८ टक्के) २०,०३९.०४ अंकांवर बंद झाला. ६ जानेवीर २०११नंतर पहिल्यांदाच सेन्सेक्सनं ही उसळी घेतलीय. याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीनं २५.२० अंकांची उसळी घेत ६,०६४.४० अंकांवर झेप घेतली.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये १.०५ टक्क्यांनी वाढ होऊन ८९८.९५ रुपयांवर बंद झालेत. याचप्रमाणे भारत पेट्रोलियमचे शेअर्स ९.६४ टक्क्यांच्या उसळीनं ४३४.०५ रुपये, इंडिय ऑईल १०.४६ टक्यांच्या उसळीनं ३४८,९५ रुपये तर ऑईल इंडिया ८.९५ टक्क्यांच्या उसळीनं ५६१ रुपयांवर बंद झाले. ओएनजीसीच्या शेअर्समध्ये ७.३१ टक्क्यांनी वाढ होऊन ते ३३७.५० रुपयांवर पोहचलेत.

First Published: Friday, January 18, 2013, 18:17


comments powered by Disqus