शिवडी बनणार पर्यटनस्थळ! Sewri to become tourist destination

शिवडी बनणार पर्यटनस्थळ!

शिवडी बनणार पर्यटनस्थळ!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईच्या इतिहासाची साक्ष असलेला शिवडी किल्ला आणि फ्लेमिंगो पक्षांसाठी प्रसिद्ध असलेला शिवडी खाडीचा परिसर आता राज्याच्या पर्यटन स्थळाच्या नकाशावर येणार आहे. मुंबई शहराचे पालकमंत्री जयंत पाटील ह्यांनी या दोन्ही ठिकाणांची आज पहाणी केली.

ऑक्टोबर ते मे महिन्यापर्यंत शिवडी खाडीचा किनारा गुलाबी फ्लेमिंगोंनी फुललेला असतो. पक्षीप्रेमींना मोहात पाडणारं हे दृश्य... त्यांना पाहण्यासाठी भरपूर गर्दी होते, पण त्या पर्यटकांसाठी पिण्याचं पाणी, प्रसाधनगृह अशा सुविधा इथे नाहीत. त्यामुळे पर्यटकांना त्रास होतो. शिवडीतलं दुसरं महत्त्वाचं ठिकाण म्हणजे शिवडीचा किल्ला. पण त्यासंदर्भातला बोर्डच कुठे नसल्यानं पर्यटकांना किल्ला शोधावा लागतो. पण आता हे चित्र बदलणार आहे. शिवडी पर्यटनस्थळ करण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यादृष्टीनं जयंत पाटलांनी या परिसराची पाहणी केली.

मुंबईत गेट वे ऑफ इंडिया, एलिफंटापासून अनेकपर्यंटन स्थळं आहे. मात्र शिवडी किल्ला आणि शिवडी खाडीचा परिसर विकसित झाल्यानं आणखी एक पर्यंटन स्थळ मुंबईकरांसाठी आणि मुंबईत येणा-या पर्यटकांसाठी उपलब्ध होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, August 27, 2013, 19:14


comments powered by Disqus