फेसबुक वादः पालघरचे कुटुंब झाले गुजरातला स्थायिक, shahin tranfered to gujarat

फेसबुक वादः पालघरचे कुटुंब झाले गुजरातला स्थायिक

फेसबुक वादः पालघरचे कुटुंब झाले गुजरातला स्थायिक


www.24taas.com, मुंबई

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर फेसबुकवर कमेंट करणाऱ्या दोन्ही मुली आणि त्यांचे कुटुंबीय पालघर सोडून गुजरातमध्ये स्थायिक झाले आहेत. शाहिन महाराष्ट्र सोडणार अशा बातम्या गेल्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या.

पालघर येथील एका २१ वर्षीय तरुणीने बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर फेसबुकवर कमेंट केली होती. या कमेंटला तिच्या एका मैत्रिणीने लाईक केले होते. या घटनेनंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तरुणींच्या काकांच्या हॉस्पिटलची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली होती.

फेसबुक प्रकरणी पोलिसांनी दोन्ही युवतींना अटक केली होती. कोर्टात त्यांना जामीन मिळाल्यानंतर सुटका झाली होती. दोन्ही युवतींना अटकेमुळे हे प्रकरण गाजले होते. याप्रकरणी पोलिस अधीक्षकांना निलंबित करण्यात आले. पोलिस अधीक्षकांच्या निलंबनानंतर शिवसेनेने पालघरमध्ये बंद पुकारला होता. या सर्व प्रकरणानंतर दोन्ही युवतींच्या कुटुंबीयांनी पालघर सोडण्याचा निर्णय घेतला. पालघर सोडून ते गुजरातमध्ये स्थायिक झाले आहेत.

First Published: Monday, December 3, 2012, 19:44


comments powered by Disqus