पालघरमध्ये ‘फेक’बुकांचं पेव! , many facebook fake accounts in palghar

पालघरमध्ये ‘फेक’बुकांचं पेव!

पालघरमध्ये ‘फेक’बुकांचं पेव!
www.24taas.com, ठाणे

पालघर फेसबुक प्रकरणानंतरही बनावट अकाउंट तयार करून दिवसेंदिवस वादग्रस्त कमेंन्ट करण्याचं पेव वाढतच चाललंय. पालघरमध्येचं पुन्हा एकदा अशी घटना समोर आलीय.

पालघर मीररचे संपादक हुसैन खान यांच्या नावानं हे फेक अकाउंट तयार करण्यात आलंय. त्यांनी सतर्कता म्हणून तातडीने पालघर पोलिसांना एका अर्जाद्वारे याबाबतची माहिती दिली. याप्रकरणी चौकशी करून बनावट अकाउंट तयार करुन वाद निर्माण करणाऱ्यांवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलीयं.

या आधी पालघरचीच्याच सुनिल विश्वकर्मा या उत्तर भारतीय तरुणाच्या नावानं बनावट फेसबुक अकाउंट तयार करुन मनसेप्रमुख राज ठाकरेंविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह – अश्लिल असा मजकूर टाकण्यात आला होता. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या मुलाचं फेसबुक अकाउंट ‘फेक’असल्याचं लक्षात आल्यातनंतर या अल्पवयीन मुलाला सोडण्यात आलं होतं.

First Published: Saturday, December 1, 2012, 11:54


comments powered by Disqus