शरद पवारांची तब्बेत बिघडली, उपचारानंतर घरी, Sharad Pawar`s health failed

शरद पवारांची तब्बेत बिघडली, उपचारानंतर घरी

शरद पवारांची तब्बेत बिघडली, उपचारानंतर घरी
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना बॉम्बे हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांची प्रकृती स्थीर असल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

मुंबईतील यशवंतराव सभागृहात युवती मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी शरद पवार जात होते. मात्र, प्रवासदरम्यान, त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना तेथूनच रूग्णालयात हलविण्यात आले. प्रवासादरम्यान त्यांना जास्त दगदग वाढल्याने त्यांचा रक्तदाब वाढला. त्यामुळे त्यांच्या छातीत कळा जाणवत होत्या. त्यांना अस्वस्थ वाटू लागले.

पवार यांना तात्काळ बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. डॉ. बी. के. गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली शरद पवारांवर उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यांना आराम पडल्याने घरी सोडण्यात आले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, November 21, 2013, 15:06


comments powered by Disqus