Last Updated: Saturday, December 22, 2012, 16:32
www.24taas.com, मुंबई वांद्र्यातील चेतना कॉलेज परिसरात एकतर्फी प्रेमप्रकरणातून मुलीवर चाकूहल्ला करुन स्वतःला भोसकून घेणाऱ्या निखील बनकरचा मृत्यू झालाय.
निखीलनं त्याच्यासोबत टी.वाय.बीएमएसच्या तिसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या मुलीवर चाकूहल्ला केला होता. त्यानंतर स्वतःवरही वार करुन घेतले होते. दोघांनाही हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान, निखिल बनकरचा मृत्यू झाला तर मुलीवर अजूनही उपचार सुरु आहेत.
निखिल आणि संबधित तरुणीची मैत्री होती. त्यानंतर ती मैत्री संपुष्टात आली होती. त्यानंतर निखीलनं मुलीला प्रपोज केलं होतं. मात्र, मुलीनं निखीलला कोणताही प्रतिसाद दिला नव्हता. याबाबत मुलीच्या पालकांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी निखीलला समजही दिली होती. जखमी तरुणी मीरा रोडची राहणारी आहे तर मुलगा सेल्स टॅक्स ऑफिसरचा मुलगा असल्य़ाचं सांगण्यात येतंय.
First Published: Saturday, December 22, 2012, 16:30