एकतर्फी प्रेमातून हल्ला झालेल्या तरूणीचा मृत्यू, chetna college student payal balsar death

एकतर्फी प्रेमातून हल्ला झालेल्या तरूणीचा मृत्यू

एकतर्फी प्रेमातून हल्ला झालेल्या तरूणीचा मृत्यू
www.24taas.com, मुंबई

मुंबईत चॉपर हल्ला झालेल्या तरूणीचा मृत्यू झाला आहे. चेतना कॉलेजमधील पायल बलसारा ही ती दुर्दैवी तरूणी आहे. एकतर्फी प्रेमातून मित्रानं तिच्यावर हल्ला केला होता.

त्यानंतर आरोपी बनकरनं याने स्वत:वर वार केले होते. ज्यात त्याच्याही मृत्यू झाला होता. जखमी पायलवर गुरूनानक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र तिला वाचवण्यात अपयश आलं आणि अखेर तिचा दुर्दैवी अंत झाला.

२२ डिसेंबर २०१२ रोजी सकाळी अकराच्या सुमारास निखील बनकर या युवकाने एकतर्फी प्रेमातून तरूणी पायलवर जीवघेणा हल्ला केला होता.

First Published: Tuesday, December 25, 2012, 13:50


comments powered by Disqus