Last Updated: Saturday, September 7, 2013, 15:11
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई शिवसेनेचे मुखमत्र असलेल्या `सामना`च्या अग्रलेखातून गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे लोकसभा निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख नरेंद्र मोदींना कानपिचक्या देण्यात आल्या आहेत. ज्यांना पंतप्रधानपदाची स्वप्न पडतात, त्यांना ते पद नेहमीच हुलकावणी देतं असा स्पष्ट इशारा या अग्रलेखातून देण्यात आला आहे.
पंतप्रधानपदाची इच्छा स्वप्नातही पाहिलं नसल्याचं मोदींनी दोन दिवसांपूर्वीच जाहिर केलं होतं. मात्र आज छत्तीसगडमधील त्यांच्या भाषणावरून मोदींच्या पंतप्रधानपदाबाबत नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत. रमणसिंह यांच्या विकासयात्रेसाठी मोदी आज छत्तिसगडमध्ये आहेत.
यावेळी मोदींच्या सभेसाठी दिल्लीतील लालकिल्ल्याची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं, मोदींसाठी बनवलेल्या या मंचावर कडाडून टीका केली आहे. त्यामुळे आजच्या सभेत मोदी काय बोलतात याकडे सा-यांचं लक्ष्य लागलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Saturday, September 7, 2013, 14:07