Last Updated: Saturday, September 7, 2013, 15:11
शिवसेनेचे मुखमत्र असलेल्या `सामना`च्या अग्रलेखातून गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे लोकसभा निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख नरेंद्र मोदींना कानपिचक्या देण्यात आल्या आहेत. ज्यांना पंतप्रधानपदाची स्वप्न पडतात, त्यांना ते पद नेहमीच हुलकावणी देतं असा स्पष्ट इशारा या अग्रलेखातून देण्यात आला आहे.