Last Updated: Thursday, June 19, 2014, 12:02
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमहाराष्ट्राला १०० टक्के शिवसेनेचाच मुख्यमंत्री मिळेल असा विश्वास आज शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून करण्यात आलाय. सामनाच्या संपादकीयातून ही भूमिका मांडण्यात आलीय.
अग्रलेखात शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदाचा दावा आणखी मजबूत केलाय. शिवसेनेच्या ताकदीवर १०० टक्के महाराष्ट्र जिंकणार असा विश्वास यात व्यक्त करण्यात आलाय. याआधी भाजपनेही मुख्यमंत्रीपदावर जोरदार दावा केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून आता शिवसेना भाजपमध्ये स्पर्धा शिगेला पोहोचलाय.
दरम्यान, शिवसेनेचा आज ४८ वा वर्धापन दिन वा वर्धापन दिन साजरा होतोय. या वर्धापन दिनाचं औचित्य साधून कालपासून शिवसेनेचा दोन दिवसांचा पदाधिका-यांचा मेळावा होतोय. या मेळाव्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने रणनिती ठरवण्यात येत आहे. आज शिवसेना पत्रप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने या शिबिराचा समारोप करण्यात येणार आहे.
उद्धव ठाकरे यांनी स्वतः राज्याचं नेतृत्व करावं, मुख्यमंत्री व्हावं अशी मागणी आता पक्षात जोर धरत असताना ते स्वतः काय निर्णय घेतात यावर सर्वाचं लक्ष लागलंय. निवडणुकीच्या रणनितीबाबत आत्तापर्यंत पक्षात प्रचंड गुप्तता बाळगण्यात येतेय. संपूर्ण शिबिरात प्रसारमाध्यमांना दूर ठेवण्यात आलंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, June 19, 2014, 11:52