रामदास आठवलेंना शिवसेनेचा एका जागेचा प्रस्ताव, Shiv Sena trying to woo Athawale again

रामदास आठवलेंना शिवसेनेचा एका जागेचा प्रस्ताव

रामदास आठवलेंना शिवसेनेचा एका जागेचा प्रस्ताव
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

शिवसेनेनं रिपाइं नेते रामदास आठवलेंची नाराजी दूर करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेनेनं रिपाइला लोकसभेची एक जागा सोडण्याची तयारी दर्शवलीय. खासदार संजय राऊत यांनी रामदास आठवलेंची मुंबईतल्या रंगशारदा हॉटेलमध्ये भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत आठवलेंसमोर लोकसभेसाठी एक जागेचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय.

मुळात आठवलेंनी शिवसेना-भाजपकडे लोकसभेच्या सहा जागांची मागणी केली होती. त्यामध्ये दक्षिण मध्य मुंबई, कल्याण, पुणे, लातूर, रामटेक आणि सातारा तसंच राज्यसभेच्या एका जागेचा समावेश होता. या मागण्यांचा प्रस्ताव आठवलेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्याकडे लेखी स्वरुपात पाठवला होता. पण त्यावर पंधरा दिवस उलटूनही काहीच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे नाराज आठवले आणखीनच अस्वस्थ होते. ते काँग्रेसच्या संपर्कात असल्याच्याही चर्चा सुरू झाल्या होत्या.

त्यामुळे वेळीच शिवसेनेनं आठवलेंच्या नाराजीची दखल घेत एका जागेचा प्रस्ताव ठेवलाय. पण ही जागा कुठली ते अजून निश्चित झालेलं नाही. पण उर्वरित दोन जागा आणि राज्यसभेची जागा या मागणीचं काय, हा मुद्दा अजूनही अधांतरीच आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, September 24, 2013, 23:07


comments powered by Disqus