Last Updated: Tuesday, January 29, 2013, 13:39
www.24taas.com, मुंबईशिवसेनेतून मनसेत येण्यास अनेक इच्छुक असल्याचे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले होते. `मनसेत येण्याची इच्छा असणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांबाबत बाळा नांदगावकर यांनी म्हंटले होते की, जवळजवळ ४० नेते मनसेत येण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना आणि मनसे यांच्यात कोण बाजी मारणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
मनसे नेते बाळा नांदगावकरांचे मते, `शिवसेनेचे अनेक नेते मनसेच्या वाटेवर आहेत.` `चांगल्या लोकांचे मनसेत स्वागतच आहे. मात्र स्वतःहून कोणताही पक्ष फोडणार नाही` असंही वक्तव्य मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केले.
आणि पक्ष फोडाफोडीचे कोणतेही राजकारण केले जाणार नाही. किंबहुना शिवसेनेबाबत तरी असा विचारच नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र जर ४० नेत्यांनी मनसेत प्रवेश केला तर मात्र सेनेसाठी हा फार मोठा धक्का असेल.
First Published: Tuesday, January 29, 2013, 13:28