दक्षिण मुंबई मतदार संघात कोण जिंकणार?

Last Updated: Friday, March 28, 2014, 22:29

दक्षिण मुंबई मतदारसंघात आप मैदानात असले तरी खरी लढत काँग्रेस, शिवसेना आणि मनसेतच होणाराय.

मनसेचे बाळा नांदगावकर अंतुलेंच्या भेटीला

Last Updated: Tuesday, March 25, 2014, 16:53

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर अंतुलेंच्या भेटीला गेले आहेत. शेकापचे जयंत पाटीलही नांदगावकरांबरोबर आहेत. आता शेकाप्रमाणेच अंतुले मनसेला पाठिंबा देणार का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बाळा नांदगावकरांसमोर मनसेचे दोन गट भिडले

Last Updated: Friday, January 17, 2014, 13:55

लोकसभा उमेदवारी संदर्भात चाचपणी करण्यासाठी चंद्रपुरात आलेल्या मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासोरच मनसेचे दोन गट एकमेकांशी भिडले.

अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा

Last Updated: Friday, December 13, 2013, 12:38

जनलोकपालसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीतील आंदोलनाला राज ठाकरे यांच्या मनसेने पाठिंबा दिला आहे. याआधी आम आदमी पार्टीटे कुमार विश्वास यांनी भेट घेतली होती. त्यावरून वादंग निर्माण झाला. अण्णांचे कार्यकर्ते नाराज झाले होते. आता मनसेने पाठिंबा दर्शवून अण्णांची भेट घेण्याचे ठरविले आहे.

जादुटोणाविरोधी विधेयकाला मनसेचा पाठिंबा

Last Updated: Friday, December 6, 2013, 17:20

जादुटोणाविरोधी विधेयकाला मनसेचा पाठिंबा आहेच, मात्र उपवास करणे, वास्तुशांती करण्यासारखे काही मुद्द्यांबाबत आम्हाला संभ्रम आहे. त्यामुळे तो दूर होईपर्यंत आम्हाला विरोध करावाच लागेल, असे मनसेचे विधानसभेतील गटनेते आमदार बाळा नांदगावकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

काटजूंना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवा – बाळा नांदगावकर

Last Updated: Tuesday, April 2, 2013, 08:03

प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवावं, असं मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे योग्यवेळी उत्तर देतील- नांदगावकर

Last Updated: Monday, March 11, 2013, 18:22

विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंच्या टीकेला मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी जोरदार उत्तर दिलंय. मनसेला नको त्या गोष्टी उघड करण्यास भाग पाडू नका असं सांगत विरोधी पक्षनेत्यांनी आजपर्यंत सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नांचा लेखाजोखा द्यावा असं आव्हान दिलंय.

NCPने लोकशाही मार्गाने विरोध करावा- नांदगावकर

Last Updated: Wednesday, February 27, 2013, 09:22

मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी राज यांच्या ताफ्यावरील हल्लाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केलेत... विरोध करायचा असल्यास लोकशाही मार्गाने करा अन्यथा समोर येऊन हल्ले करा असं आव्हान त्यांनी राष्ट्रवादीला दिलंय...

मनसेला टोला, ४० काय ४०० घेऊन जा - उद्धव ठाकरे

Last Updated: Tuesday, January 29, 2013, 16:08

सामनाला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेचा खरपूस समाचार घेतला. ४० काय ४०० जणांना न्या.

सेनेतील ४० नेते मनसेच्या वाटेवर - बाळा नांदगावकर

Last Updated: Tuesday, January 29, 2013, 13:39

`मनसेत येण्याची इच्छा असणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांबाबत बाळा नांदगावकर यांनी म्हंटले होते की, जवळजवळ ४० नेते मनसेत येण्याच्या मार्गावर आहेत.

राजचा मोर्चा हिंदूचा विश्वासघात- बाळासाहेब

Last Updated: Wednesday, August 29, 2012, 19:58

रझा अकादमीच्या कार्यक्रमात मनसेचे आमदार बाळा नांदगावकर सामील झाल्याबद्दल बाळासाहेब ठाकरे यांनी मनसेच्या विराट मोर्चावर टीकास्त्र सोडले आहे. मोर्चा काढणारे पक्ष रझा अकादमीच्या कार्यक्रमात सहभागी होत असतील, तर हा हिंदूंचा विश्वासघात आहे, असा जोरदार हल्ला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ` सामना ` च्या अग्रलेखातून केला आहे.

मोर्चासाठी मनसे सज्ज... पोलिसही दक्ष!

Last Updated: Tuesday, August 21, 2012, 15:24

मनसेचे कार्यकर्ते हळूहळू गिरगाव चौपाटीवर जमायला सकाळपासूनच सुरुवात झालीय. तर दुसरीकडं मोर्चासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केलाय.

'बाळा नांदगावकर राजीनाम्यावर शिक्कामोर्तब'

Last Updated: Wednesday, February 22, 2012, 08:41

मनसे आमदार बाळा नांदगावकर विधानसभेतील गटनेतेपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. सल्लागार समिती बैठकीला नांदगावकर गैरहजर राहिल्याने याला आता दुजोरा मिळाला आहे.

बाळा नांदगावकर गटनेतेपद सोडणार?

Last Updated: Tuesday, February 21, 2012, 10:31

आ.बाळा नांदगावकरांनी गटनेतेपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे

'एमएमआरडीए'साठी अण्णांना 'मनसे' पाठिंबा

Last Updated: Thursday, December 22, 2011, 19:51

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा हेतू स्वच्छ आहे. त्यामुळं राज्य सरकारनं त्यांना त्यांच्या आंदोलनासाठी एमएमआरडीए मैदान सवलतीच्या दरात उपलब्ध करुन द्यावं अशी भूमिका मनसेनं घेतलीय.

मराठी माणसाला पेटवू नका

Last Updated: Saturday, December 24, 2011, 11:18

बाळा नांदगावकर
परप्रांतवादाचे राजकारण आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले नाही. मुळात हा मुद्दा कोणी उकरून काढला हे आपण पाहिले पाहिजे. काँग्रेसच्या संजय निरूपम यांना आताच काय गरज होती बोलायची