‘देशद्रोही दिग्विजय; अफजल गुरुसोबत तुरुंगात टाका!’, shivsena on digvijay singh

‘देशद्रोही दिग्विजय; अफजल गुरुसोबत तुरुंगात टाका!’

‘देशद्रोही दिग्विजय; अफजल गुरुसोबत तुरुंगात टाका!’
www.24taas.com, मुंबई

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेनं केलीय. त्यांना संसदेवरच्या हल्ल्याप्रकरणी आरोपी असलेल्या अफजल गुरूसोबत तुरूंगात टाका… असा हल्लाही शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चढवलाय.

सोमवारी, आरएसएसकडून चालविण्यात येणारे कँप हे हिंदू दहशतवादाला खतपाणी घालत आहेत, असं म्हणणाऱ्या सुशीलकुमारांची पाठराखण करणाऱ्या दिग्विजय सिहांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्यं केलं. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड असणाऱ्या हाफिझ सईदचा आदरयुक्त उल्लेख करत दिग्विजय सिहांनी ‘हाफिज सईद साहाँब’असा उल्लेख केला आणि एका नव्या वादाला तोंड फुटलं.

यावरच शिवसेनेनं जोरदार हल्ला चढवलाय. दिग्विजय सिंह यांनी असं वक्तव्य करून देशद्रोही असल्याचं सिद्ध केलंय. ‘हाफिज सईद साहाँब’म्हणणाऱ्या काँग्रेस नेतृत्वाकडून प्रसंगी हाफिज सईदलाही अध्यक्ष म्हणून घोषित केलं जाईल, असा टोलाही यावेळी राऊत यांनी लगावलाय.

हाफिज सईद हा पाकिस्तानमधील `जमात-उद-दवा` या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. तर गेल्या अनेक वर्षांपासून दहशतवादी कारवाया करणा-या `लष्कर-ए-तोयबा` या संघटनेचा संस्थापक आहे. हाफिज सईद हा मुंबईवरील २००८ मध्ये झालेल्या २६-११ च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आहे.

First Published: Tuesday, January 22, 2013, 08:48


comments powered by Disqus