Last Updated: Thursday, August 1, 2013, 09:00
www.24taas.com,झी मीडिया, मुंबईमुंबईचं वेगळं राज्य का होऊ शकत नाही, असा प्रश्न विचारत लेखिका शोभा डे यांनी नवा वाद निर्माण केला आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जळळीत प्रतिक्रिया व्यक्त केली. हे घटस्फोट घेण्याइतकं सोपं नाही, हे शोभा डेंना बरोबर समजेल, अशी तिखट प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिलीय.
आंध्रप्रदेश या राज्याचे विभाजन करताना तेलंगणा हे नवे राज्य अस्तीत्वात आणण्यात येत आहे. तसा केंद्र सरकारने स्वतंत्र राज्य निर्मितीला हिरवा कंदील दाखविला आहे. तेलंगणा राज्यावरून मुंबई आणि महाराष्ट्र का वेगळं नको, असं शोभा डे यांचं ट्विट केलं. हे त्यांना ट्विट महागात पडण्याची शक्यता आहे.
या ट्विटवरून राजकीय प्रतिक्रिया तात्काळ उमटल्यात. शोभा डे ! घटस्फोट घेण्याइतकं हे सोपं नाही, असं राज म्हणालेत. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही जोरदार टीका केली.
शोभा डे यांचा ट्विटMaharashtra and Mumbai??? Why not? Mumbai has always fancied itself as an independent entity, anyway. This game has countless possibilities.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, July 31, 2013, 15:24