शिकाऱ्याला गोळ्या घाला, मुख्यमंत्र्यांचे आदेश, shoot at site to tiger huntsman - cm

शिकाऱ्याला गोळ्या घाला, मुख्यमंत्र्यांचे आदेश

शिकाऱ्याला गोळ्या घाला, मुख्यमंत्र्यांचे आदेश
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आता जो वाघाची शिकार करेल, त्याची खैर नाही... कारण वाघाची शिकार करणाऱ्याला ताबडतोब गोळ्या घालण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. व्याघ्र दिनानिमित्त सरकारनं नवी मोहीम सुरू केलीय. त्याअंतर्गत वाघाला वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

दमदार चाल... सोनसळी त्वचा... करारी बाणा... जरब बसवणारी नजर... या दिमाखात वावरणारं हे उमदं जनावर... जंगलात दरारा असणारा आणि वन्यजगताचं वैभव असणाऱ्या या वाघांची संख्या घटत चाललीय. जगभरात हा चिंतेचा विषय ठरलाय. वाघाच्या संरक्षणाचे आणि याविषयी जनजागृतीचे कितीही प्रयत्न झाले तरी वाघाची शिकार थांबत नाहीत. म्हणूनच राज्य सरकारनं वाघाच्या संरक्षणासाठी नवं पाऊल उचललंय. ‘लिव्ह मी अलोन... सेव्ह द टायगर...’ ही मोहीम सुरू करण्यात आलीय. वाघाची शिकार करणाऱ्या शिकाऱ्याला दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आलेत.

वाघाची कातडी आणि नखांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्यामुळे वाघांच्या शिकारीमागे आंतरराष्ट्रीय टोळीचा समावेश असल्याचा संशय आहे. ‘सेव्ह द टायगर’ ही मोहीम आणखी सक्षम करण्यासाठी सेलिब्रिटींनीही पुढाकार घेतलाय.

वाघाला जगवणं अत्यंत गरजेचं आहे. आता ‘शूट अॅट साईट’चे आदेश दिल्यावर तरी वाघांची शिकार थांबेल, अशी अपेक्षा आहे. पण, या आदेशाची अंमलबजावणी योग्य पद्धतीनं झाली तरच वाघ प्राणी वाचू शकतील अन्यथा तो जंगल बुकमधल्या फक्त गोष्टींपुरताच उरेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, July 31, 2013, 09:46


comments powered by Disqus