‘शिवबंधन’ मनगटावर बांधून शिवसेना कार्यकर्ते प्रतिज्ञाबद्ध होणार, ShivSena`s Sivabandhana pledge

शिवबंधन- शिवसेना कार्यकर्ते प्रतिज्ञाबद्ध होणार

शिवबंधन-  शिवसेना कार्यकर्ते  प्रतिज्ञाबद्ध होणार
www.24taas..com, झी मीडिया, मुंबई

‘शिवबंधन’ धागा मनगटावर बांधून लाखो शिवसेना कार्यकर्ते आणि शिवसेनाप्रेमी प्रतिज्ञाबद्ध होणार आहेत. प्रतिज्ञा दिन सोहळ्याला दुपारी २ वाजता सुरुवात होईल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी सोमय्या मैदानावर प्रतिज्ञाबद्ध होणार आहेत.

विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या ठिकाणांहून लाखो शिवसेना कार्यकर्ते मुंबईत दाखल होत असून सोमय्या मैदानावर गर्दीचे सर्व विक्रम मोडीत काढण्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन शिवसेनेच्यावतीने ‘प्रतिज्ञा दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत.

तुळजाभवानीच्या चरणावर तसेच शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळी ठेवून विधिवत पूजन करण्यात आलेला ‘शिवबंधन’ धागा कार्यकर्त्यांना देण्यात येणार आहे. ‘प्रतिज्ञा दिना’साठी सोमय्या मैदानावर ८० बाय ४० फुटांचे व्यासपीठ उभारण्यात आले आहे. या व्यासपीठावर ७० बाय ६० फुटी भव्य स्क्रीनवर शिवसेनाप्रमुखांचे छायाचित्र आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, January 23, 2014, 07:20


comments powered by Disqus