नारायण राणेंना मुख्यमंत्री करण्यासाठी वाढला दबावSome group wants Narayan Rane became CM

नारायण राणेंना मुख्यमंत्री करण्यासाठी वाढला दबाव

नारायण राणेंना मुख्यमंत्री करण्यासाठी वाढला दबाव
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

राज्यातील मुख्यमंत्री बदलाचे वारे जोरात वाहत असातानाच उदयोग मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री करण्याबाबत काँग्रेसमध्ये एक दबाव गट तयार झालाय. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी एक आक्रमक नेतृत्वाची गरज आहे, असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे.

दिल्लीत नेतृत्व बदलाचे वारे सुरू झाल्यानंतर काँग्रेसच्या अनेक आमदारांनी नारायण राणेंशी संपर्क केल्याची सुत्रांची माहिती आहे. त्यानुसार राणेंच्या नावाला काँग्रेसमधून वाढता पाठिंबा मिळत असल्याचं चित्र आहे.

दुसरीकडे सुशीलकुमार शिंदेंना मुख्यमंत्रीपदासाठी पक्षश्रेष्ठींनी विचारणा केली असली तरी ते अजूनही हे पद स्वीकारायला पूर्णपणे तयार नाहीत, अशीही सूत्रांची माहिती आहे. दुसरीकडे नव्या मुख्यमंत्र्याचे नाव ठरवताना दिल्लीतील आमदारांच्या बैठकीत निरीक्षकांसमोर आमदार काय मत मांडतात याबाबत उत्सुकता आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, June 20, 2014, 20:06


comments powered by Disqus