मुंबईतील प्रवाशांच्या सोईसाठी एसटीच्या जादा बसेस Special 60 Buses for Mumbai peoples today because B

मुंबईतील प्रवाशांच्या सोईसाठी एसटीच्या जादा बसेस

मुंबईतील प्रवाशांच्या सोईसाठी एसटीच्या जादा बसेस
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आज मुंबई शहर आणि परिसरात बेस्टची वाहतूक कोलमडल्यामुळे प्रवाशांच्या मदतीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीनं ज्यादा बसेस सोडण्याची व्यवस्था केलीय. मुंबई शहरात प्रवासी वाहतुकीसाठी ६० जादा बसेस सोडल्या आहेत.

या बसेस वाशी-चेंबूर-दादर-शिवाजी छत्रपती टर्मिनस (बोरीबंदर), बोरीवली-अंधेरी-वांद्रे-शिवाजी पार्क-वरळी-चर्चगेट आणि ठाणे-घाटकोपर-कुर्ला-दादर-सीएसटी या मार्गावर सुरू करण्याक आल्या आहेत.

या बसेसच्या सुमारे १५० फेऱ्यांव्यतिरिक्त प्रवाशांच्या गरजेनुसार अतिरिक्त जादा बसेस सोडण्यात येतील, असं एसटी प्रशासनानं स्पष्ट केलंय.

राज्य सरकारनं प्रवाशांच्या सोईसाठी मुंबई शहरात खाजगी बसेस, वाहनं, स्कूल बस, टेम्पो, माल ट्रकद्वारे प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिलीय. त्याचप्रमाणे एसटीच्या बाहेरगावांहून येणाऱ्या सर्व बसेस आपल्या नियोजित अंतिम स्थानकावर पोहोचण्यापूर्वी मुंबई शहरातील बेस्टच्या बस थांब्यावर प्रवाशांसाठी थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 1, 2014, 12:17


comments powered by Disqus