थर्टी फस्टसाठी यंदा मुंबईत विशेष ऑफर्स!special offers for Thirty First year in Mumbai!

थर्टी फस्टसाठी यंदा मुंबईत विशेष ऑफर्स!

थर्टी फस्टसाठी यंदा मुंबईत विशेष ऑफर्स!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

३१ डिसेंबर आता काही दिवसांवरच आलाय... याच पार्श्वभूमीवर मुंबईतल्या हॉटेल्स, रेस्टॉरेंट आणि पब या ठिकाणी जय्यत तयारी सुरू झालीये... पार्टीमध्ये तुम्ही जर दारू पिणार असाल तर तुमची गाडी चालविण्यासाठी ड्रायव्हर पुरविण्याची खबरदारी घेतली जातेय.

मुंबईमध्ये ३१ डिसेंबरची रात्र म्हणजे धिंगाणा, मस्ती आणि दारू... म्हणूनच काही दिवसांवर आलेल्या ३१ डिसेंबरच्या नाईटसाठी रेस्टॉरेंट्सनं कंबर कसलीये. ठिकठिकाणी पार्ट्यांचं आयोजन केलं जातंय. यासाठी आता हॉटेल्स ही सज्ज झालीयेत. हॉटेलमध्ये पार्टीसाठी आकर्षक पॅकेजेस तयार करण्यात आलीयेत. यामध्ये कुठे इंटरनॅशनल बॅन्ड, तर कुठे परदेशी खाद्य पदार्थांची मेजवानी तयार करण्यात येणार आहे. याबरोबरच आता दारू पिल्यावर घरी सुरक्षित जाण्यासाठी ड्रायव्हर देखील उपलब्ध करू दिले जाणार आहे.

तुम्ही रात्रभर पार्टी करणार असाल पण घरी सुरक्षित पोहचाल का अशी भिती वाटत असेल तर काळजी करू नका. कारण पार्टी हार्ड ड्रायव्हर हे तुम्हाला घरी पोचविण्यासाठी तयार झालेत. ‘पार्टी हार्ड ड्रायव्हर’ ही एक अशी संस्था आहे. ही तुम्हाला तुम्ही दारू पिल्यावर तुमच्या गाडीसाठी ड्रायव्हर उपलब्ध करून देते. ३१ डिसेंबरच्या रात्रीसाठी ही सेवा रात्री १० वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र यासाठी तुम्हाला आठ तासांचे १५०० रूपये मोजावे लागणार आहेत.

दारू पिऊन गाडी चालविल्यामुळं अपघात होण्याची दाट शक्यता असते. वर्षाच्या पहिल्याचदिवशी कुणालाही तुमच्या बेजबाबदारपणामुळं जीव गमवावा लागू नये एवढी काळजी तर नक्कीच प्रत्येकानं घेतली पाहिजे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, December 28, 2013, 22:28


comments powered by Disqus