दहावीची परीक्षा सुरू; हॉल तिकीट नसेल तर.... , SSC BOARD EXAM STARTS TODAY, DONT HAVE HALL TICKET?

दहावीची परीक्षा सुरू; हॉल तिकीट नसेल तर....

दहावीची परीक्षा सुरू; हॉल तिकीट नसेल तर....

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

दहावीची परीक्षा आजपासून सुरु होतीय. हॉल तिकीटच्या घोळामुळे  गेले काही दिवस विद्यार्थी आणि पालकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागलाय. हा सारा घोळ निस्तरण्याचा प्रयत्न मुंबई विभागीय मंडळ रविवारी संध्याकाळपर्यंत करत होते. त्यासाठी रविवारीच्या सुट्टीच्या दिवशीही बोर्डाचे कार्यालय सुरु होते.

आजच्या दिवशीही विद्यार्थ्यांकडे हॉलतिकीट नसेल तर त्यांनी शाळेत जाऊन मुख्याध्यपकांच्या लेटरहेडवर तात्पुरते हॉलतिकीट घ्यावे असं आवाहन बोर्डानं केलंय. ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेशी तयारी केल्याची माहितीही बोर्डानं दिलीय. संपूर्ण राज्यात १७ लाख २८ हजार ३६८ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.

ज्या विद्यार्थ्याकडे प्रवेशपत्र म्हणजेच हॉलतिकीट नसेल त्यांना जवळच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देता येणार आहे, अशा विद्यार्थ्यांनी काय करावे ते पाहूया...

* शाळेजवळच्या कोणत्याही परीक्षा केंद्रावर जावे

* तेथे हमीपत्र घेऊन परीक्षेला बसण्याची परवानगी

* केंद्रप्रमुख विद्यार्थ्याची शाळेकडून सविस्तर माहिती मागवतील

* मंडळाकडून विद्यार्थ्यांचा आसनक्रमांक मिळेल

* हा क्रमांक विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेवर लिहावा



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, March 3, 2014, 08:23


comments powered by Disqus