Last Updated: Thursday, August 29, 2013, 21:03
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईयासिन भटकळची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र एटीएसचं पथक रवाना झालंय. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ही माहिती दिलीय. यासिन भटकळ हा वॉन्टेड अतिरेकी आहे आणि त्याच्यावर वेगवेगळ्या आठ गुन्ह्यांची नोंद आहे. यासंदर्भात त्याची कस्टडी मिळवण्याची प्रक्रियाही सुरू झालीय.
यासिन भटकळ हा ‘इंडियन मुजाहिदिन’ या अतिरेकी संघटनेचा संस्थापक आहे. यासिनला केलेली अटक ही केंद्रीय तपास संस्थांचं मोठं यश असल्याचं सरकारी वकील उज्वल निकम यांनी म्हटलं आहे. केंद्रीय तपास संस्थांनी यासिन भटकळला केलेल्या अटकेच्या कारवाईचे गृहमंत्री श्री. पाटील यांनी कौतुक केलं.
आत्तापर्यंतच्या ५० घातपातांचा मास्टरमाईंड असलेल्या यासिनवर महाराष्ट्रातल्या ८ स्फोटांसाठी जबाबदार मानलं जात आहे. राज्यातील मुंबई आणि पुणे येथील बॉम्बस्फोटांमध्ये यासिन भटकळ हा ‘वॉन्टेड’ आतंकवादी आहे.
महाराष्ट्रातल्या गुन्ह्यांबद्दल भटकळची कस्टडी मागण्याची प्रक्रिया राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने सुरु केली आहे. एटीएसचं पथक त्यासाठी रवाना झालं आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, August 29, 2013, 21:03