Last Updated: Friday, May 10, 2013, 14:47
www.24tass.com, झी मीडिया, मुंबई वर्दीतला पोलीस रूबाबदार दिसायला हवा. त्याला पाहिले की तो आपले रक्षण करेल असा विश्वास जनतेला वाटायला हवा. ढेरपोटे, थकलेले पोलीस सेवेत नकोत. असे फिटनेस सल्ले केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पोलीसांना दिले.
‘पोलीस अथवा निमलष्करी दलातील जवान चपळ आणि दक्षच असायला हवा. गणवेशातील जवानाचे व्यक्तिमत्त्व सामान्य जनतेसाठी आश्वासक असायला हवे. वर्दीतला जवान पाहताक्षणीच हा आपले रक्षण निश्चितच करू शकेल असा विश्वास नागरिकांना वाटायला हवे असे आपले व्यक्तिगत मत आहे’ असे शिंदे यांनी सांगितले. नागरी संरक्षण दल आणि गृहरक्षक दलाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात बोलताना शिंदे यांनी या फिटनेस टिप्स दिल्या.
तसेच चिनी घुसखोरीचे उदाहरण देत सुशीलकुमारांनी सांगितले की, ‘सध्या मोठी युद्धे होत नसली तरी भविष्यात असे प्रसंग आपल्यावर येऊ शकतात. शांततेच्या काळातही युद्धासाठीची सज्जता ठेवावी लागते. नागरी संरक्षण दल अथवा गृहरक्षक दलाचे स्वयंसेवक युद्धाव्यतिरिक्त मानवनिर्मित अथवा नैसर्गिक आपत्तीप्रसंगी जनतेची उत्तम सेवा करू शकतात.’
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, May 10, 2013, 14:40