सुशीलकुमार शिंदेंवर शस्‍त्रक्रि‍या यशस्‍वी Sushil Kumar Shinde`s operation successful

सुशीलकुमार शिंदेंवर शस्‍त्रक्रि‍या यशस्‍वी

सुशीलकुमार शिंदेंवर शस्‍त्रक्रि‍या यशस्‍वी
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यावर मुंबईतल्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आज ऑपरेशन करण्यात आलं. शिंदे यांना फुफ्फुसांचा आजार असल्यानं त्यांना शनिवारी रात्री हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं.

शिंदेंना ३ दिवस आयसीयूमध्ये ठेवण्यात येणार असून नंतरचे १० दिवस त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु राहणार आहेत. मुंबईतल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमच्या उदघाटन सोहळ्यासाठी गृहमंत्री शनिवारी मुंबईत आले होते.. मात्र रात्रीच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

दरम्यान ऑपरेशननंतर त्यांची प्रकृती चांगली असल्याचं प्रणिती शिंदे यांनी म्हटलंय असं पीटीआयने बातमी दिलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.




First Published: Sunday, August 4, 2013, 22:52


comments powered by Disqus