ऑपरेशन ससून डॉक : तडफडतायत `छोटे मासे`

Last Updated: Saturday, April 26, 2014, 21:41

कोवळ्या वयातल्या मुलांनी खेळावं, बागडावं, शाळेत शिकावं... पण सगळ्यांच्याच नशिबात ते नसतं... काही कळ्या फुलण्याआधीच खुरडल्या जातात... आज `झी 24 तास करणार आहे असाच एक मोठा पर्दाफाश... मोठे मासे छोट्या छोट्या माशांचं कसं शोषण करतायत... हे लोकांच्या समोर आणण्याचा हा एक प्रयत्न... `ऑपरेशन ससून डॉक`...

ऑपरेशन हवाला : कोण आहे मोईन कुरैशी?

Last Updated: Thursday, April 17, 2014, 11:41

मांस निर्यातीचा धंदा करणाऱ्या मोईन कुरैशी नावाच्या व्यक्तीच्या घरांवर आणि ऑफिसेसवर इन्कम टॅक्स विभागाने छापे घातले. मोईन हवाला कारभार चालवत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पण, हा मोईन कुरैशीचा इतिहास नक्की काय आहे... जाणून घेऊयात...

ऑपरेशन हवाला : मोईन कुरेशीचा पर्दाफाश, हवाला रॅकेटचे संबंध १० जनपथपर्यंत

Last Updated: Thursday, April 17, 2014, 09:05

चार मोठे केंद्रीय मंत्री आणि नेत्यांच्या हवाला कनेक्शनचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केलाय `झी मीडिया`नं... मोईन कुरैशी नावाच्या एका मांस निर्यातदाराच्या माध्यमातून सुरू होता हा करोडो रूपयांचा हवाला कारभार... आम्ही करतोय त्याचा पर्दाफाश...

द. कोरियात जहाज पलटल्यानं 476 प्रवासी बुडाले, रेस्क्यू ऑपरेशन सुरू

Last Updated: Wednesday, April 16, 2014, 10:09

दक्षिण कोरियाच्या दक्षिण तटावर जहाज समुद्रात पलटलंय. त्यामुळं जहाजात असलेल्या 476 प्रवाशांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी तटरक्षक जहाजं आणि हेलिकॉप्टर कामाला लागले आहेत. जहाजामधील प्रवाशांमध्ये जास्तीत जास्त शाळेचे विद्यार्थी आहेत. तटरक्षक दलाच्या एका प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार जहाज समुद्रात उतरलं आणि पाण्यात बुडालं.

`विंदू`च्या दाव्यांचा ललित मोदीकडून इन्कार

Last Updated: Tuesday, February 25, 2014, 12:47

आयपीएल मॅच फिक्सिंग प्रकरणात झालेल्या खळबळजनक खुलाशावर आयपीएलचा माजी संचालक ललित मोदी याने तातडीनं खुलासा दिलाय.

धक्कादायकः शाळेमध्ये चक्क दारुड्यांचा अड्डा, कॅमऱ्यात कैद

Last Updated: Tuesday, January 21, 2014, 21:11

आता एक धक्कादायक बातमी नाशिकमधून... नाशिक महापालिकेच्या शिक्षणाविषयीच्या उदासीन धोरणामुळे महापालिकेच्या स्थापनेपासून ३५ शाळा बंद पडल्याचा स्पेशल रिपोर्ट झी मीडियानं चार दिवसांपूर्वी दाखवली होती...

केजरीवालांचे सरकारी स्टींग ऑपरेशन, हेल्पलाईन नंबर जारी

Last Updated: Wednesday, January 8, 2014, 20:32

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरकारी भ्रष्टाचार संपविण्यासाठी विडा उचलला आहे. यासाठी आधी जाहीर केल्याप्रमाणे त्यांनी हेल्पलाईन नंबर प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिक सकाळी ते रात्री यावर संपर्क साधून आपली तक्रार करू शकणार आहे. त्यामुळे केजरीवाल यांचे हे सरकारी स्टींग ऑपरेशन असेल, असे म्हटले जात आहे.

पाहा - कोयनेत पाण्याखाली अनोखा आविष्कार

Last Updated: Friday, January 3, 2014, 13:12

स्थापत्य अभियांत्रिकीचा अनोखा आविष्कार सध्या कोयनेच्या पाण्याखाली अनुभवायला मिळतोय. कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या देखभाल दुरूस्तीच काम सध्या सुरु आहे. कोयनेच्या टीमनं दाखवलेलं धाडस तसेच कौशल्यामुळ आपल्या राज्याचं सुमारे १६०० कोटींचं संभाव्य नुकसान टळलं आहे.

स्टींग ऑपरेशन : पोलीस प्रशिक्षण केंद्रातही लागते चिरी-मिरी!

Last Updated: Wednesday, December 25, 2013, 22:31

सर्वात जास्त भ्रष्टाचारी खातं कोणतं? हा प्रश्न मनात आला तर उत्तर मिळतं पोलीस खातं... आणि ही बाब स्पष्ट होते ती, लाचलूचपत प्रतिबंध विभागाच्या आजवरच्या आकडेवारीवरुन.

दिल्ली मेट्रोच्या खोल्या आणि टॉयलेट प्रेमींसाठी भाड्यानं

Last Updated: Wednesday, September 18, 2013, 12:30

दिल्लीतल्या मेट्रोच्या सीसीटीव्ही फुटेजचा एमएमएस बनवून विकण्याचा प्रकार नुकताच घडला असतांना, दिल्ली मेट्रो पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकलीय. झी मीडियानं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. मेट्रो रेल्वेच्या खोल्या आणि टॉयलेट प्रेमी युगुलांना सर्रास भाड्यानं दिले जातायेत. त्याद्वारं मेट्रोतील कर्मचारी पैसा कमवतायेत.

सुशीलकुमार शिंदेंवर शस्‍त्रक्रि‍या यशस्‍वी

Last Updated: Sunday, August 4, 2013, 22:52

केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यावर मुंबईतल्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आज ऑपरेशन करण्यात आलं. शिंदे यांना फुफ्फुसांचा आजार असल्यानं त्यांना शनिवारी रात्री हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं.

उत्तराखंड : रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण, अंत्यसंस्कार सुरू!

Last Updated: Thursday, June 27, 2013, 16:35

उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये लष्काराचं रेस्क्यू ऑपरेशन फत्ते झालंय. परंतु, पुराच्या गाळात अडकलेले शव मात्र अजूनही तिथंच फसलेले आहेत. हे शव बाहेर काढण्याचं काम आता प्रशासनाला करायचंय.

आयपीएलचे ‘ऑपरेशन क्लीन-अप’

Last Updated: Tuesday, June 11, 2013, 11:11

आयपीएल प्रकरणाची चौकशी चालू असतानाच ‘बीसीसीआय’च्या कार्यकारी समितीनं आयपीएल ‘ऑपरेशन क्लीन अप’चा नवीन मसुदा मांडलाय.

गँगरेप प्रकरणाची धग दिल्लीत कायम

Last Updated: Monday, December 24, 2012, 09:57

दिल्ली गँगरेप प्रकरणाची धग अद्याप कायम आहे. आंदोलन चिघळू नये यासाठी आजही कलम १४४ अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आलीय. तसच इंडिया गेट परिसर मोकळा करण्यात आलाय. तसच याठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आलीय.

`ती`ची प्रकृती अजूनही चिंताजनक... ऑपरेशननंतर व्हेंटिलेटरवर

Last Updated: Sunday, December 23, 2012, 23:00

दिल्ली गँगरेप प्रकरणातल्या पीडित मुलीची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. काही वेळापूर्वीच सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांच्या पथकानं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

डॉक्टरांची किमया, चुकीच्या पायावर शस्त्रक्रिया

Last Updated: Sunday, December 2, 2012, 18:42

पिंपरी-चिंचवडमधल्या धनश्री रुग्णालयात एका पाच वर्षीय चिमुरड्याला डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा फटका बसलाय. दुखापत झालेल्या डाव्या पायावर शस्त्रक्रिया करण्यासाठी तो रुग्णालयात दाखल झाला खरा, पण डॉक्टर त्याच्या उजव्या पायावर शस्त्रक्रिया करून मोकळे झाले.

`झी २४ तास`च्या `स्टिंग ऑपरेशन`मध्ये बिल्डरांचा पर्दाफाश

Last Updated: Sunday, October 21, 2012, 09:19

मुंबईचे बिल्डर हवेत घरं बांधण्यात उस्ताद आहेत. झी बिझनेसच्या एका इन्वेस्टिगेशनमध्ये याबाबतची खरीखुरी माहिती समोर आली. प्रोजेक्टला साधी प्राथमिक मंजूरी मिळण्याआधीच ग्राहकांना घराचं स्वप्न दाखवण्यात येतंय. एवढंच नाहीतर बिल्डर ग्राहकांकडे 40 टक्के पर्यंत ब्लॅकमनीची मागणी करतायेत.

अम्पायर्सची लाचखोरी... स्टींग ऑपरेशनमध्ये झाली उघड

Last Updated: Tuesday, October 9, 2012, 11:25

नुकत्याच पार पडलेल्या टी २० वर्ल्डकप आणि ऑगस्टमध्ये पार पडलेल्या श्रीलंका प्रिमीअर लीग दरम्यान जवळजवळ सहा अम्पायर्सनं ‘चहा-पाणी’ देणाऱ्या टीमच्या बाजूनं निर्णय देण्याची तयारी दाखवली होती. ही गोष्ट एका स्टींग ऑपरेशनमध्ये उघड झालीय.

ऑपरेशन ब्लू स्टार : निवृत्त अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला

Last Updated: Tuesday, October 2, 2012, 12:53

१९८४ साली सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी योजलेल्या ऑपरेशन ब्लू स्टारचं नेतृत्व करणारे सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल के. एस. बराड यांच्यावर काल रात्री मध्य लंडनमध्ये जीवघेणा हल्ला करण्यात आला.

लाचखोर मुख्याध्यापकाचे स्टिंग ऑपरेशन

Last Updated: Monday, July 2, 2012, 13:27

मृत शिक्षकाच्या पेन्शनच्या कागदपत्रांवर सही करण्यासाठी लाचेची मागणी या मुख्याध्यापकानं केली आहे. इतकंच नाहीतर या मृत शिक्षकाच्या मुलाकडं त्यानं पार्टीचीही फर्माइश केली. याचा भांडाफोड झी 24 तासवर करण्यात आलं आहे.

ऑपरेशन डॉक्टर

Last Updated: Friday, May 11, 2012, 00:13

डॉक्टर आणि औषध कंपन्यांत साटेलोटं असल्याची चर्चा नेहमीच होत आलीय, झी 24तासने हा प्रकार सर्वांसमोर आणल्यानंतर या घटनेची मुंबईच्या महापौरांनी गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिलेत.

पुण्यात मगरमिठीची भीती कायम

Last Updated: Wednesday, February 29, 2012, 20:32

पुण्यातल्या खडकवासल्यातल्या मगरीला पकडण्यात आलं असलं तरी पुण्य़ाची मगरमिठीतून सुटका झालेली नाही. पुण्यातल्या वेगवेगळ्या तलावांमध्ये मगरी असल्याची माहिती मिळालीय. त्यामुळे या मगरी नक्की येतात कुठून, असा प्रश्न आता पुणेकरांना पडला आहे.

पुण्यात अखेर मगर मुठीत

Last Updated: Tuesday, February 28, 2012, 21:31

पुण्यात खडकवासला धरणातलं ऑपरेशन मगर अखेर फत्ते झालंय. बारा तासांच्या प्रयत्नांनंतर मगरीला जाळ्यात पकडण्यात यश आलंय. मगर जेरबंद झाल्यावर पुणेकरांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

अमुलचे जन्मदाते व्हर्गीस कुरिअन नव्वदीत

Last Updated: Saturday, November 26, 2011, 16:52

भारतातील श्वेत क्रांतीचे प्रणेते वर्गीस कुरिअन यांनी नुकताच नव्वदीत प्रवेश केला. कुरिअन यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन फ्लड यशस्वी झालं आणि त्यामुळेच आज भारत जगात दुग्ध उत्पादनात पहिल्या क्रमांकाचा देश आहे.