Last Updated: Friday, October 5, 2012, 16:59
www.24taas.com, मुंबईअजित पवारांच्या राजीनाम्याच्या धाडसामागे मंत्रालयाला लागलेली आग कारणीभूत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता. त्याला राज्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी उत्तर दिलंय.
राजकारणात असे आरोप होतातच, मंत्रालयात जलसंपदा विभाग कोणत्या मजल्यावर होता हे सगळ्यांना माहीत असल्याचं त्यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरेंना जलसंपदा विभाग कुठे आहे, याची माहिती आहे का? असा सवालही त्यांनी केला.
अजित पवारांच्या राजीनाम्यामागे मंत्रालयाची आग तर नाही ना असा संशायत्मक सवाल त्यांनी उपस्थित केला होता. सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप असताना अजितदादा मोकळेपणाने फिरण्याचे धाडस कसं करू शकतात असा खोचक सवालही त्यांनी केला होता
First Published: Friday, October 5, 2012, 16:55