Last Updated: Wednesday, May 16, 2012, 21:09
www.24taas.com, मुंबई सिंचनाच्या श्वेतपत्रिकेवरून आजच्या कॅबिनेट बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादीत जोरदार खडाजंगी झाली. श्वेतपत्रिकेबाबत राष्ट्रवादीनं अनुकुलता दर्शवलीय. त्यानंतर पुढील पंधरा दिवसात सिंचनाबाबत सादरीकरण झाल्यानंतर श्वेतपत्रिका काढण्यात येईल अशी माहिती मुख्य़मंत्र्यांनी बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
तत्पूर्वी कॅबिनेटच्या बैठकीत जलसंपदा मंत्री सुनील तटकरेंनी सिंचनाबाबत सादरीकरण करू देण्याची मागणी केली. तसंच कृषी खात्याकडून सिंचनाबाबत दिली गेलेली आकडेवारी सादरीकरणासाठी हवी असल्याचीही मागणी केली.
यावर काँग्रेस मंत्र्यांनी सादरीकरण नव्हे तर श्वेतपत्रिकाच काढण्याची मागणी केली. त्यावर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनीही श्वेतपत्रिकाच हवी मात्र सादरीकरण करण्याची गरज असल्याची भूमिका घेतली. तसंच श्वेतपत्रिकेबाबत बैठकीतच निर्णय घेण्याची मागणी केली. मात्र सादरीकरणानंतरच श्वेतपत्रिका काढली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.
First Published: Wednesday, May 16, 2012, 21:09