अभिनेता शाहरुखचा वानखेडेवर धिंगाणा - Marathi News 24taas.com

अभिनेता शाहरुखचा वानखेडेवर धिंगाणा

www.24taas.com, मुंबई
 
अभिनेता शाहरुख खान वादाच्या भोव-यात सापडला आहे. त्यांने वानखेडे स्टेडियमवर धिंगाणा घातल्याने सर्वच हैराण झाले आहेत.  मुंबई इंडियन्स आणि कोकलता नाईट रायडर्स  यांच्यात सामना सुरू होता. त्यावेळी हा प्रकार घडला. शाहरूख प्रकरणी तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
 
कोकलता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्या मॅचनंतर शाहरुख ड्रेसिंग रुममध्ये गेला त्यानंतर त्यानं वानखेडेवर घुसण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मुंबई क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार रवी सावंत यांनी केला.
 

मॅच संपल्यानं मैदानावर जाण्यास सुरक्षारक्षकांनी शाहरुखला मनाई केली. त्यामुळं चिडून त्यानं आणि त्याच्या बॉडीगार्ड्सनी एमसीएचे पदाधिकारी आणि सुरक्षारक्षकांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केल्याची तक्रार पोलीसांकडे देण्यात आली आहे. यामुळं त्याला वानखेडेवर प्रवेश करण्यास बंदी घालण्याची एमसीए शक्यता आहे.
 
 
 
व्हिडिओ पाहा...
 

First Published: Thursday, May 17, 2012, 10:46


comments powered by Disqus