Last Updated: Thursday, May 17, 2012, 18:16
www.24taas.com, मुंबईशाहरुख खानविरोधात मरिन ड्राईव्ह पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. शाहरुखसह इतर चार जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप शाहरुखवर ठेवण्यात आला.
एमसीए सुरक्षारक्षक व्ही बी दळवी यांच्या तक्रारीनंतर दुपारी दोन वाजता हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
दरम्यान, वानखेडेवर गेलो त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी माझ्या मुलांना धक्काबुक्की केली, मला शिव्या देण्यात आल्या, त्यावेळी मी मद्यप्राशन केले नव्हते, असे स्पष्टीकरण बॉलिवुडचा किंग शाहरुख खान याने दिले आहे. मात्र, सुरक्षा रक्षकांनी शिवीगाळ केल्यानंतर मीही शिवी दिली, पण मी माफी मागणार नाही, त्यांनीच माझी माफी मागावी, असेही त्याने यावेळी सांगितले.
काल कोलकत्ता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर सामना झाला. या सामन्यात कोलकत्ता नाइट रायडर्सने मुंबईचा पराभव केला. या सामन्यानंतर शाहरुखने मैदानात जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुरक्षा रक्षक आणि मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी शाहरुखचा वाद झाला. या वादानंतर स्पष्टीकरण देण्यासाठी शाहरुखने आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी तो बोलत होता.
घडलेल्या प्रकाराबद्दल मी माफी मागणार नाही. उलटपक्षी त्यांनी माझी माफी मागावी अशी मागणी शाहरुखने केली आहे. कोणत्याही १३ वर्षीय मुलीला धक्काबुक्की करणे कितपत समर्थनीय आहे. आम्ही त्यावेळी पिचवर नव्हतो, मैदानाच्या एका बाजुला होतो. सुरक्षा रक्षकांनी शिवीगाळ केली, त्यानंतर मी प्रत्युत्तर दिल्याचेही शाहरुख खान याने मन्नत या आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
First Published: Thursday, May 17, 2012, 18:16