Last Updated: Saturday, May 19, 2012, 15:53
www.24taas.com, मुंबई मुंबईच्या वरळी सी लिंकवरुन उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या एका तरुणीला एका पोलीस शिपायानं वाचवलं. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घ़डली.
आत्महत्येचा प्रयत्न करणारी तरुणी कांदिवलीची राहणारी आहे. ती एका टॅक्सीनं वरळी सी लिंकवर आली. पुलाच्या कठड्यावरुन तिनं थेट समुद्रात उडी मारली. टॅक्सीचालकानं आरडाओरडा केल्यानंतर सी लिंकवर ड्युटीवर असलेले पोलीस शिपाई गुणाजी पाटील यांनी थेट समुद्रात उडी मारली. त्यांच्या मदतीला इतर पोलिसांनीही समुद्रात उड्या घेतल्या. पोलिसांनी स्वःतचा जीव धोक्यात घालून तरुणीला वाचवलं.
तब्बल वीस ते पंचवीस मिनिटं समुद्रात हा थरार सुरु होता. आत्महत्येचा प्रयत्न करणा-या तरुणीला किरकोळ जखमा झाल्या असून तिला वरळीच्या पोतदार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलयं.
First Published: Saturday, May 19, 2012, 15:53