जुहूत रेव्ह पार्टीवर छापा... - Marathi News 24taas.com

जुहूत रेव्ह पार्टीवर छापा...

www.24taas.com, मुंबई 
 
रविवारी, पोलिसांनी मुंबईत सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर धाड टाकली. यावेळी ३८ मुली आणि ५८ मुलांना ताब्यात घेतलं गेलंय. पार्टीसाठी आणलेले अंमली पदार्थही पोलिसांनी जप्त केलेत.
 
जुहूच्या ‘ओक वुड’ या उच्चभ्रू हॉटेलवर छापा टाकण्यात आलाय. रेव्ह पार्टी सुरु असल्याच्या माहितीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली. अतिरिक्त पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. त्यात ३८ मुली आणि ५८ मुलांना ताब्यात घेण्यात आलंय. यात 19 परदेशी आहेत. रेव्ह पार्टीतील दोघेजण आयपीएल खेळाडू असल्याची शंकाही उपस्थित होतेय. अचानक टाकलेल्या या धाडीमुळे पार्टीमध्ये उपस्थित असलेल्या सगळ्यांचीच धांदल उडाली. या पार्टीमधून 150 ग्रँम कोकेन, 100 ग्रँम एक्सएमडी अशी अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहेत.
 
या कारवाईमुळे राज्यात अजूनही रेव्ह पार्ट्या सुरू असल्याचं पुन्हा एकदा उघड झालं आहे.

First Published: Sunday, May 20, 2012, 23:29


comments powered by Disqus