Last Updated: Monday, May 21, 2012, 07:39
www.24taas.com, दिनेश मौर्या, मुंबई मुंबईत जुहूच्या ‘ओकवूड हॉटेल’मध्ये रेव्ह पार्टी करणाऱ्या १०० तरुण-तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. धक्कादायक बाब म्हणजे, या पार्टीत राहूल शर्मा आणि वेन पार्नेल हे आयपीएलचे दोन खेळाडूही सहभागी झाल्याचं समोर आलंय.
पुणे वॉरियर्स संघातला फास्ट बोलर वेन पॉर्नेल आणि स्पिनर राहुल शर्मा यांना पार्टीत सहभागी झाल्याबद्दल पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या रेव्ह पार्टीतून 100 तरुण तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यामध्ये 38 मुली आणि 58 मुलांचा समावेश आहे. त्यात अनेक विदेशी मुलींचा समावेश आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पार्टीच्या ठिकाणाहून 150 ग्रँम कोकेन, 100 ग्रँम एक्सएमडी असे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले.
दरम्यान, मेडिकल झाल्यानंतर दोन्ही क्रिकेटपटूंसह काही जणांना पर्सनल बाँडवर सोडून देण्यात आलंय. सेलिब्रिटी आणि बॉलिवूडशी संबधित काही जण या पार्टीत सहभागी झाले होते. या सगळ्यांची तपासणी केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
विविध कृष्ण कृत्यांनी बदनाम झालेल्या आयपीएलवर चौफेर टीका होतेय. अनेकांनी तर आयपीएलवर बंदी घालण्याची मागणी केलीय. स्पॉट फिक्सिंग... शाहरुखचा वानखेडेवरचा धिंगाणा... ‘ल्यूक’ या क्रिकेटपटून अमेरिकन महिलेची काढलेली छेड... या घटनांमुळे आधीच बदनाम झालेल्या आयपीएलची आणखी एक काळी बाजू रविवारी रात्री उघड झाली.
First Published: Monday, May 21, 2012, 07:39