Last Updated: Monday, May 21, 2012, 16:00
www.24taas.com, मुंबई रेव्ह पार्टीमध्ये सापडलेल्या राहूल शर्मानं स्पष्टीकरण नुकतंच स्पष्टीकरण दिलंय. मी निर्दोष आहे... ती रेव्ह पार्टी होती, याची मला किंचितही नव्हती कल्पना. मी तर वाढदिवसाच्या पार्टीला गेलो होतो, असं राहूलचं म्हणणं आहे. राहूल शर्मा हा पुणे वॉरियर्सचा खेळाडू आहे. सोबतच त्या आपण ड्रग्ज घेतलं नव्हतं, असा दावाही राहूलनं यावेळी केलाय.
राहूलप्रमाणे 'क्योंकी... साँस भी कभी बहू थी'फेम शिल्पा अग्निहोत्री आणि 'परदेस' फिल्मचा खलनायक अपूर्व अग्निहोत्री यांनीही पत्रकार परिषदेत आपल्यावरचे आरोप फेटाळून लावले. काल पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या १०० जणांमध्ये अग्निहोत्री दांपत्यांचाही समावेश होता. आपणही आपल्या पतीसोबत वाढदिवसाच्या पार्टीला गेल्याचा दावा तिनं केलाय.
रेव्ह पार्टीत सहभाग आढळल्यानं पोलिसांनी काल पुणे वॉरियर्स संघातला फास्ट बोलर वेन पॉर्नेल आणि स्पिनर राहुल शर्मा यांना ताब्यात घेतलं होतं. आयपीएलमधील आणखी ४ खेळाडूंचा या पार्टीत सहभागाची शक्यता आहे. पोलिसांनी धाड टाकल्यानंतर हे चौघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले होते. त्यांची नावं मात्र अजूनही उघड झाली नाहीत. सेलिब्रिटी आणि बॉलिवूडशी संबधित आणखी काही जण या पार्टीत सहभागी झाले होते. मेडिकल झाल्यानंतर दोन्ही क्रिकेटपटूंसह काही जणांना पर्सनल बाँडवर सोडून देण्यात आलंय. पार्टीच्या ठिकाणाहून 150 ग्रँम कोकेन, 100 ग्रँम एक्सएमडी असे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले.
First Published: Monday, May 21, 2012, 16:00