Last Updated: Tuesday, May 22, 2012, 12:06
www.24taas.com, मुंबई मुंबईतल्या ओकवूड हॉटेलमधील रेव्ह पार्टीचं गूढ आणखीनच वाढलंय. या रेव्ह पार्टीची मुख्य सूत्रधार महिला असल्याचं समोर आलंय. आयपीएलच्या खेळाडूंना पार्टीत आणण्यात याच महिलेनं पुढाकार घेतल्याचंही समोर आलंय.
पार्टीत येण्यासाठी विशिष्ट कोडचा वापर करण्यात येत होता. तसंच त्यांना विशिष्ट गॉगल आणि हातात बँड बांधण्यास सांगण्यात आलं होतं. गॉगल आणि बँडशिवाय कोणत्याही व्यक्तीला या पार्टीत प्रवेश नसल्याचं सांगण्यात येतंय. या महिलेच्या मर्जीतल्या व्यक्तींनाही या पार्टीत प्रवेश होता.
रविवारी, पोलिसांनी मुंबईत सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर धाड टाकली. यावेळी ३८ मुली आणि ५८ मुलांना ताब्यात घेतलं. पार्टीसाठी आणलेले अंमली पदार्थही पोलिसांनी जप्त केले होते. या महिलेचा आता पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आलाय. याशिवाय या पार्टीत लाखो रुपयांचं ड्रग्स कुठून आलं आणि ड्रग पेडलर कोण आहेत याचाही मुंबई पोलीस तपास करत आहेत.
First Published: Tuesday, May 22, 2012, 12:06