मराठा आरक्षण निर्णय १५ ऑगस्टपर्यंत! - Marathi News 24taas.com

मराठा आरक्षण निर्णय १५ ऑगस्टपर्यंत!

www.24taas.com, मुंबई
मराठा समाजाला आरक्षणाला देण्यासाठी सरकारनं अनुकूलता दाखवत 15 ऑगस्टपर्यंत निर्णय घेण्याचं आश्वासन राज्य सरकारनं आज मराठा संघटनांना दिलं.... पण आरक्षण पदरात पडण्याआधीच मराठा संघटनांत श्रेयाची लढाई सुरु झालीय....
 
आजच्या बैठकीला बोलावलं नाही म्हणून शिवसंग्राम संघटनेचे नेते आमदार विनायक मेटे मुख्यमंत्र्यांवर नाराज झालेत.... मुख्यमंत्र्यांवर पक्षपातीपणाचा आरोप करून सरकारच्या आश्वासनावर विश्वास नाही अशी आदळाआपट विनायक मेटेंनी सुरू केलीय....
 
आजच्या बैठकीत मराठा महासंघ आणि अन्य संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते, पण मेटेंच्या शिवसंग्राम संघटनेला निमंत्रण नव्हतं.... त्यातच आरक्षणाचा निर्णय अंतिम टप्प्यात आल्यानं आता मराठा संघटनांमध्ये श्रेयाची लढाई सुरु होण्याची चिन्हं दिसू लागलीत......
 
दरम्यान, मराठा आरक्षणाबाबात सरकार अनुकूल आहे, अशी माहिती समाजकल्याण मंत्री शिवाजीराव मोघे यांनी दिलीय. 15 ऑगस्टपूर्वी याबाबतचा निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलय. तसचं आरक्षण दिल्यास मराठा समाजाचा समावेश ओबीसींमध्ये करण्यात येणार नाही, तर मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं जाईल, असंही त्यांनी म्हटलय.
 
मराठा आरक्षण संघर्ष समितीनं आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्र्यांची यासंदर्भात भेट घेऊन चर्चा केली. या भेटीत सरकार सकारात्मक असल्याची माहिती मोघेंनी दिलीय.
 

First Published: Tuesday, May 22, 2012, 20:12


comments powered by Disqus