Last Updated: Sunday, May 27, 2012, 18:37
www.24taas.com, मुंबई दोनशेहून अधिक दुर्मिळ मासे आणि दुर्मिळ अशा पाणवनस्पती पहाण्याची संधी मुंबईकरांना मिळाली आहे. माटुंग्यातल्या रुईया महाविद्यालयात ‘अॅक्वा लाईफ २०१२’ हे दुर्मिळ माशांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय. 28 मे पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. २५ रुपयांपासून ते सव्वा लाखांपर्यंतचे मासे मुंबईकरांना या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत.
अँजेल, ब्लॅक मूर, जेली फिश, रेड चिली आणि मरिन फिशच्या अनेक जाती तसंच वेगवेगळ्या रंगाचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे मासे एकाच वेळी पाहायला मिळणं, ही खरं तर मुंबईकरांसाठी पर्वणीच आहे. एरवी या साऱ्या माशांचा मुक्काम खोल खोल समुद्रात असतो. त्यामुळेच असे दुर्मिळ जातीचे मासे आणि या दुर्मिळ पाणवनस्पती पाहायला मिळणं सहसा शक्य होत नाही. म्हणूनच ‘लौकिक क्रिएशन’नं हे मासे आणि पाणवनस्पती पाहण्याची संधी मुंबईत उपलब्ध करुन दिली आहे. विशेष म्हणजे हे मासे कुठल्याही मत्स्यालयात नाहीत तर, माटुंग्यातल्या रुईया महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘अॅक्वा लाईफ २०१२’मध्ये हे समुद्रवैभव पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. मुंबईत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात अशा प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आल आहे. या प्रदर्शनाला मुंबईकरांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे. याच दुर्मिळ माशांना तुमच्या घराच्या फिश टँकमध्येही ठेवता येणार आहे.
28 मे पर्यंत हे प्रदर्शन रुईया महाविद्यालयात सुरू राहणार आहे. समुद्रातला हा दुर्मिळ ठेवा पाहण्याची ही संधी मुंबईकरांनी अवश्य घ्यावी.
व्हिडिओ पाहण्यासाठी :
First Published: Sunday, May 27, 2012, 18:37