रेल्वेचा मुंबईत प्लास्टिक हटाव नारा - Marathi News 24taas.com

रेल्वेचा मुंबईत प्लास्टिक हटाव नारा

 www.24taas.com, मुंबई
 
 
मध्य रेल्वेने प्लास्टिक हटाव नारा दिला आहे. रेल्वे ट्रॅकवर साठणा-या प्लास्टिकच्या पिशव्या रॅंपरमुळे पाणी तुंबण्याचे प्रकार दुसरीकडे अशा स्थितीचा रेल्वे प्रशासनाला सामना करावा लागत होता. त्यामुळे यावर मात करण्यासाठी  प्लास्टिकवर सरळ बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
 
 
प्लास्टिकची समस्या रेल्वेला दरवर्षी पावसाळ्यात भोगावी लागते. अनेक ठिकाणी मार्गावर पाणी साचल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम होत असतो. परिणामी याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. त्याचा फटका रेल्वेप्रशासनालाही भोगावा लागतो. यावर मात करण्याचा मार्ग मध्य रेल्वेने शोधला असून प्लॅटफॉर्मवरील स्टॉलमधून प्लास्टिकच्या वेष्टनात विकल्या जाणाऱ्या सर्व खाद्यपदार्थांवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे येत्या आठवडाभरातच सीएसटी ते खोपोलीपर्यंतच्या सर्व स्टॉलवरील वेफर्स , बिस्किटे , चॉकलेट गायब होणार आहेत.
 
 
दररोज गोळा होणाऱ्या कचऱ्यात प्लास्टिक वेष्टनांचा मोठा साठा आढळून येतो. त्यामुळे मध्य रेल्वेने प्लास्टिकबंदीचा निर्णय घेतला असून त्याबाबत सर्व स्टॉल्सचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. दिलेल्या मुदतीनंतरही स्टॉलवर प्लास्टिकच्या वेष्टनातील पदार्थांची विक्री केल्यास कारवाई होईल , अशी माहिती मध्य रेल्वेचे चीफ कमर्शिअल मॅनेजर शरद इंगळे यांनी दिली. दरम्यान, या बंदीला विरोध झाला नसला तरी व्यापाऱ्यांचे नुकसान होणार आहे.
 
हे पदार्थ विकणार कसे?
 
' लेज ', ' अंकल चिप्स ', ' कुरकुरे ', ' चिटोज् ', ' बिंगो ', ' पेपी ', ' सनफीस्ट ' सारख्या २५ पदार्थांची यादी तयार करण्यात आली आहे. हे खा द्यपदार्थ स्टॉलचालकांना विकता येणार नाही.

First Published: Monday, May 28, 2012, 19:15


comments powered by Disqus