Last Updated: Monday, December 5, 2011, 02:56
झी २४ तास वेब टीम, मुंबई मुंबईतील वांद्रे भागातल्या 'गेट गॅलेक्सी हॉल'बाहेर काही अज्ञात लोकांनी तोडफोड केल्याची घटना घडली आहे. अज्ञातांनी सिनेमा हॉलसमोर असलेल्या दुकांनांचीही तोडफोड केली. तसंच सिनेमांची पोस्टर्सही फाडली.
रेल्वे पोलीस स्पेशल फोर्सच्या जवानांनीच ही तोडफोड केल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून आरपीएसएफच्या जवानांनी बंदुकाही काढल्याचं स्थानिकांनी म्हटलंय. मात्र, आरपीएफचे अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळलेत.
First Published: Monday, December 5, 2011, 02:56