Last Updated: Thursday, May 31, 2012, 12:08
www.24taas.com, बदलापूर कारमध्ये गुदमरून दोघा भावांचा मृत्यू झालाय. म्हाडा कॉलनीत ही घटना घडलीय. ही दोनही मुलं 2 दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार बदलापूर पोलिसांत देण्यात आली होती. शिवशंकर आणि रवीशंकर जैस्वाल अशी या मुलांची नावं आहेत.
दोन्ही मुलं 8 ते 10 वयोगटातली आहेत. दुपारी 12 च्या सुमारास मारूती झेनमध्ये दोन मुलं अडकल्याचं तिथे खेळणा-या मुलांनी पाहिलं. त्यानंतर स्थानिक पोलिसांना याबाबत कळवण्यात आलं. ही गाडी लॉक होती. गाडीचा दरवाजा उघडल्यानंतर हे दोघेही जण मृत अवस्थेत आतमध्ये आढळून आले.
गाडीत गुदमरल्याने या दोन्ही भावांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय. मात्र, हे दोन्ही भाऊ या गाडीत अडकलेच कसे, याचा शोध पोलीस घेताहेत. दोन्ही सख्ख्या भावांचा असा आकस्मिक मृत्यू झाल्याने बदलापूरच्या म्हाडा कॉलनीवर मात्र शोककळा पसरलीये.
First Published: Thursday, May 31, 2012, 12:08