NCPच्या प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा मधुकर पिचड - Marathi News 24taas.com

NCPच्या प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा मधुकर पिचड

www.24taas.com, मुंबई
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा मधुकर पिचड यांचीच  निवड झालीय. मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत पिचड यांची निवड करण्यात आलीय. सलग दुस-यांदा पिचड यांची या पदावर निवड करण्यात आलीय.
 
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून मधुकर पिचड पक्षामध्ये आहेत. काँग्रेसमध्ये असतानाही ते शरद पवारांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले मतदारसंघातून पिचड सातत्यानं निवडून येत आहेत.
 
नुकत्याच झालेल्या नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एकचा पक्ष झाला होता. तसंच, कोषाध्यक्षपदी हेमंत टकले यांची निवड झाली.

First Published: Saturday, June 2, 2012, 16:55


comments powered by Disqus