राज ठाकरे वामनराव यांच्या कुटुंबांच्या भेटीला - Marathi News 24taas.com

राज ठाकरे वामनराव यांच्या कुटुंबांच्या भेटीला

 www.24taas.com, मुंबई
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सदगुरू वामनराव पै यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. निरुपणकार वामनराव पै यांचं नुकतच निधन झालं. त्यादरम्यान राज ठाकरे ताडोबा दौऱ्यावर होते. मात्र, ताडोबा दौऱ्यावरून मुंबई परततताच त्यांनी वामनराव पै यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं.
 
जीवनविद्या मिशनचे संस्थापक सद्गुरू वामनराव पै यांचं काही दिवसापूर्वीचं मुंबईत निधन झालं. पै यांनी ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हे बोधवाक्य जनसामान्यांच्या मनावर बिंबवलं होतं. आजारपणामुळे त्यांच्यावर गेल्या काही काळापासून कोकिळाबेन रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली होती.
 
‘तूच आहेस, तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या शिकवणीतच साऱ्या जीवनाचे सार सामावलं. गेल्या ६० वर्षांत लाखो लोकांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडविण्याच्या दृष्टीनं आपलं जीवन वेचणारे वामनराव पै खऱ्या अर्थाने सदगुरु होते. अशा थोर व्यक्तीच्या कुटुंबियांच्या सात्वंनाकरिता राज ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली.
 
 
 
 

First Published: Monday, June 4, 2012, 09:47


comments powered by Disqus