Last Updated: Thursday, June 7, 2012, 18:39
www.24taas.com, मुंबईसत्यमेव जयते या कार्यक्रमातून जनजागृती करणारा बॉलिवुडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमीर खानने डॉक्टरांची माफी मागण्यास इन्कार केला आहे. त्यामुळे आता भारतीय वैद्यकीय संस्थेने माझ्याविरोधात खटला दाखल केला, तर त्यास मी तयार असल्याचे आमीरने म्हटले आहे.
आमिर खान शोमधून डॉक्टरांची तसेच त्याच्या पेशाची बदनामी केली असल्याचा आरोप करत डॉक्टरांनी आमिरकडे माफीची मागणी केली होती. त्यानंतर आमिरने माफी मागण्यास इन्कार केला होता.
मी डॉक्टरांची माफी मागणार नाही, मी डॉक्टरी पेशाचा कोणताही अपमान केला नाही. डॉक्टर असूनही काही अनैतिक गोष्टी करीत असलेल्यांनी डॉक्टरी पेशाची बदनामी केली आहे, मी नाही, असे आमिरने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
सत्यमेव जयते या शोच्या चवथ्या भागात आमिर खानने वैद्यकीय पेशात सुरू असलेल्या अनैतिक गोष्टींवर प्रकाश टाकला होता.
First Published: Thursday, June 7, 2012, 18:39