Last Updated: Sunday, June 10, 2012, 18:29
www.24taas.com, मुंबई राज्यात लवकरच गुटखा आणि पान मसाल्यांवर बंदी घालणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. ते युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलत होते.
लवकरच या बंदीबाबत मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव ठेवणार असल्याचंही त्यांनी सांगीतलय. राज्याला गुटखा, पान मसाल्यांतून १०० कोटींचा महसूल मिळतो, हा महसूल बुडाला तरी बेहत्तर, पण बंदी आणणारच असा आक्रमक सूर अजित पवारांनी लावला आहे. राज्यात गुटखा, पानमसाल्यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रीमंडळात ठेवणार असल्याचं पवार यांनी जाहीर केले.
आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पहिला राष्ट्रवादी युवती काँग्रेस राजकीय मंचचं पहिलं अधिवेशन पार पडलं. या कार्यक्रमात अजितदादांनी ही घोषणा केली. या पहिल्या अधिवेशनाच्या निमंत्रक खासदार सुप्रिया सुळे आहेत. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यापासून ते स्त्री सक्षमीकरणापर्यंतचं काम राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून करणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
First Published: Sunday, June 10, 2012, 18:29