Last Updated: Tuesday, June 12, 2012, 11:48
www.24taas.com, मुंबई मान्सूनच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईची कामं पूर्ण झाली नसल्याचं चित्र आहे. पावसाळ्याच्या तोंडावर सुरु असलेल्या या नालेसफाई आणि इतर कामांवरुन सत्ताधारी आणि विरोधक एकमेंकावर जबाबदारी ढकलत आहेत.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एमएमआरडीएच्या सुरु असलेल्या कामांची पाहणी केली. पी.डिमेलो रोड, शिवडी, वडाळा तसंच मुंबईतील इतर ठिकाणी एमएमआरडीएची कामं कशा पद्धतीनं सुरु आहेत याचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सुरु असलेल्या कामांमुळं सामान्यांना याचा त्रास सहन करावा लागतो. शिवाय वाहतुकीचाही मोठा खोळंबा होतो.
ही कामं पालिकेची नसून मुख्यमंत्र्यांच्या अधिकारक्षेत्रात येणा-या एमएमआरडीकडून सुरु असल्याचा आरोप विरोधकांकडून होतोय. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएच्या सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला.
First Published: Tuesday, June 12, 2012, 11:48