'शरद पवारांनी अर्थमंत्र्यांशी बोलायला हवं' - Marathi News 24taas.com

'शरद पवारांनी अर्थमंत्र्यांशी बोलायला हवं'

www.24taas.com, मुंबई
 
उद्योगांच्या धोरणाबाबत टीका करण्याआधी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांनी राज्याच्या अर्थमंत्र्यांशी बोलायला हवं होतं, असं मुख्यमंत्र्यांनी म्हंटलं आहे. राज्यातले उद्योग बाहेर जात असल्याबाबतची टीका गैरसमजातून होते आहे.असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.
 
महाराष्ट्र आजही उद्योगांना आकर्षित करण्यात क्रमांक एक वर आहेस असा निर्वाळा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे. व्हॅटवरुन काही उद्योगांची तक्रार आहे. मात्र त्याबाबतचे धोरण कायद्याला धरूनच असल्याचं ते म्हणाले आहेत.
 
त्यामुळे मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. त्यामुळे शरद पवार आता मुख्यमंत्र्यांना काही उत्तर देणार की त्यांच्या नेहमीच्या शैलीतच काही घडवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
 
 
 
prithviraj chavan,

First Published: Friday, June 15, 2012, 22:09


comments powered by Disqus