दोन ट्रेन समोरासमोर धडकल्या, अंधेरी स्टेशनवर अपघात - Marathi News 24taas.com

दोन ट्रेन समोरासमोर धडकल्या, अंधेरी स्टेशनवर अपघात

www.24taas.com, मुंबई
 
मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर दोन लोकलचा अपघात झाला आहे. दोन लोकलची समोरासमोर धडक झालेली आहे. अंधेरी-जोगेश्वरी एकाच ट्रॅकवर समोरासमोर दोन ट्रेनचा अपघात झाला आहे. एकाच ट्रॅकवर समोरासमोर धडक झाल्याने प्रवाशी चांगलेच संतप्त झाले आहेत.
 
संतप्त प्रवाशांकडून लोकल ट्रेनवर दगडफेक करण्यात आली आहे. अंधेरीकडून विरारकडे जाणारी रेल्वेसेवा विस्कळीत झालेली आहे. या लोकल ट्रेनच्या धडकेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण ट्रेनचे दोन डब्बे रूळावरून घसरले आहेत. तर दोन्ही ट्रेनचे चालक मात्र फरार झाले आहेत.
 
अंधेरी स्टेशनवर लोकल एकमेकांना धडकल्या असल्याने प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला आहे. आणि त्यामुळेच संतप्त प्रवाशांची ट्रेनवर दगडफेक केली आहे.  चर्चगेट- विरार, विरार- चर्चगेट दोन्ही लोकल एकाच ट्रॅकवर आल्याने धडक झाली आहे.
 
 
 
 

First Published: Sunday, June 17, 2012, 09:28


comments powered by Disqus