अफवेमुळं घडला अपघात, रेल्वेनं चिरडलं, १८ ठार

Last Updated: Sunday, November 3, 2013, 12:07

आंध्रप्रदेशातील विजयनगरम्‌ जिल्ह्यातील गोतलम गावाजवळ झालेल्या विचित्र अपघातात १८ प्रवाशांचा मृत्यू झालाय. गोतलम आणि गाजूपाटिरेगा रेल्वेस्टेशनदरम्यान संध्याकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. अफवा पसरल्यानं हा अपघात झाल्याचं समजतंय.

रेल्वेची दोन पट्टेदार वाघांना धडक!

Last Updated: Tuesday, April 16, 2013, 11:44

चंद्रपूरमध्ये दोन पट्टेदार वाघांना रेल्वेनं धडक दिलीय. केळझरजवळील चंद्रपूर - गोंदिया रेल्वे मार्गावर वनविभागाच्या प्रादेशिक वनांत चिचपल्ली कक्ष क्र. ४३८ मध्ये ही घटना घडली.

कसाऱ्याजवळ लोकल आणि एक्सप्रेसची टक्कर

Last Updated: Thursday, July 19, 2012, 23:52

मुंबईत कसा-याजवळ मोठी दुर्घटना घडलीय. कसारा लोकल आणि विदर्भ एक्सप्रेसची टक्कर झालीय. कसारा लोकल कसा-याहून सीएसटीकडे येत होती. आणि विदर्भ एक्सप्रेस मुंबईहून नागपूरला जात होती.

रेल्वे डोक्यावरून गेली, तरी मुलगी बचावली

Last Updated: Thursday, July 19, 2012, 14:00

रेल्वे खाली जीव देण्याच्या उद्देशाने एका आईने आपल्या मुलीसकट रेल्वेखाली झोकून दिलं, मात्र लोकलखाली कोणीतरी सापडल्याचे लक्षात येताच मोटरमनने ‘इमरजन्सी’ ब्रेक लावला. पण बारा डब्यांची गाडी डोक्यावरून गेली आणि तरीही नऊ वर्षांची ती चिमुरडी आश्‍चर्यकारकरीत्या बचावली.

पश्चिम रेल्वे ४० मिनिटे उशिराने

Last Updated: Sunday, June 17, 2012, 09:28

मुंबईत अंधेरी स्टेशनजवळ दोन लोकल्सची समोरासमोर धडक झाल्याने१५ प्रवासी जखमी झाले. या अपघाताचा परिणाम दुसऱ्या दिवशी दिसून आला आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक ४० मिनिटांनी उशिराने धावत आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशीही प्रवाशांचे हाल होत आहेत.

दोन ट्रेन समोरासमोर धडकल्या, अंधेरी स्टेशनवर अपघात

Last Updated: Sunday, June 17, 2012, 09:28

मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर दोन लोकलचा अपघात झाला आहे. दोन लोकलची समोरासमोर धडक झालेली आहे. अंधेरी-जोगेश्वरी एकाच ट्रॅकवर समोरासमोर दोन ट्रेनचा अपघात झाला आहे.

हंपी एक्सप्रेसला भीषण अपघात

Last Updated: Tuesday, May 22, 2012, 09:34

आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील पेनीगोंडा स्टेशनवर बंगळुरु हंपी एक्स्प्रेसला भीषण अपघात झालाय. पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात झालाय. अपघातात 9 जणांचा मृत्यू झालाय. तर 25 जण जखमी झालेत.

म. रे. रखडली, लोकलचा डब्बा घसरला.

Last Updated: Wednesday, December 21, 2011, 07:40

सीएसटी-कल्याण लोकलचा डबा घसरल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक आज सकाळी पुन्हा खोळंबली. सीएसटी-मस्जिद रेल्वे स्टेशनदरम्यान हा अपघात झाला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वरून निघाली होती. या लोकलचा सातवा डबा घसरला.

लोकल ट्रेनच्या प्रवासात गमावला डोळा

Last Updated: Tuesday, November 8, 2011, 14:44

मुंबईतला रेल्वे प्रवास हा नेहमीच धोक्याचा मानला जातो. लोकल प्रवास करणाऱ्या लोकांना त्यांचा जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. अशीच काही घटना मुबंईत घडली आहे लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेला आपला डोळा गमवाला लागला.

ऍथलीटने गमावला पाय, क्रीडा संघटनेला कदर नाय

Last Updated: Tuesday, November 8, 2011, 15:30

क्रीडा संघटनांच्या हलगर्जीपणाचा आणखी एका संतापजनक प्रकार समोर आला. एका खेळाडुला या हलगर्जीपणाचा फटका बसला. निरज सिंग हा ऍथलीट ट्रेनमधून पडल्यानं त्याच्यावर पाय गमावण्याची वेळ आली.